साप्ताहिक राशीभविष्य – रविवारी 14 ते शनिवार 20 ऑगस्ट 2022

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष – नमते धोरण ठेवा

मेषेच्या पंचमेषात सूर्य, षष्ठमेषात बुध. तुमच्या कार्याला निश्चित दिशा देण्यात यश मिळेल. जवळच्या लोकांची नाराजी दूर करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. धंद्यात नमते धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणी कमी होतील. दिग्गज लोकांसमवेत चर्चा होईल. स्पर्धेत टिकून रहा.

शुभ दिनांक-17, 18

वृषभ- अधिकाराचा वापर करा

वृषभेच्या सुखस्थानात सूर्य, पंचमेषात बुध. किरकोळ कारणाने तणाव निर्माण होईल. नोकरीत व्याप वाढेल. धंद्यात फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकाराचा योग्य वापर करा. वादाने वाद वाढतो. नम्र राहून उत्तर शोधा. कार्यावर लक्ष द्या. कुटुंबात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल.

शुभ दिनांक-14, 15

मिथुन- महत्त्वाची कामे करा

मिथुनेच्या पराक्रमात सूर्य, सुखस्थानात बुध. आठवडय़ाच्या सुरुवातीपासून महत्त्वाची कामे करा. संताप वाढवणारे प्रसंग येतील. नोकरीधंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार वाढेल. ओळखी वाढतील. चांगल्या योजना तयार करून जनहिताचा निर्णय घेता येईल.

शुभ दिनांक-16, 17

कर्क- प्रगतीची संधी मिळेल

कर्केच्या धनेषात सूर्य, पराक्रमात बुध. तुमच्या क्षेत्रात उच्च श्रेणीचे यश संपादन कराल. वेळेला महत्त्व द्या. नोकरीत मनाप्रमाणे बदल कराल. धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जुने गैरसमज दूर करून वेगाने प्रगतीची टप्पा गाठता येईल. कला, साहित्यात पुढे राहाल.  शुभ दिनांक-15, 17

सिंह- मन अस्थिर होईल

स्वराशीत सूर्य, धनेषात बुध. आठवडय़ाची सुरुवात कटकटीची वाटेल. नव्या कार्याला योग्य मेहनतीने पुढे नेता येईल. नोकरीधंद्यात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनुभवाने शिकाल. मन अस्थिर होईल. प्रकृतीची काळजी घ्या. कुटुंबात तारेवरची कसरत करावी लागेल. अहंकार दूर ठेवा.

शुभ दिनांक-17, 20

कन्या- उतावळेपणा नको

कन्येच्या व्ययेषात सूर्य, स्वराशीत बुध. उतावळेपणाने कोणतेही विधान करू नका. तुमच्या प्रगतीचा मार्ग नव्याने तयार करा. बुद्धिचातुर्याचा वापर करा. नोकरीत काम वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारी वाढेल. अपमान होईल. कुटुंबात चिंता राहील. स्पर्धेत टिकणे महत्त्वाचे असते.

शुभ दिनांक-15, 20

तूळ- समतोल राखा

तुळेच्या एकादशात सूर्य, व्ययेषात बुध. तडजोड करावी लागेल. नोकरीधंद्यात समातोल राखा. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. राजकीय, समाजिक क्षेत्रात तुमच्या होणाऱ्या प्रगतीबाबत विरोधक प्रश्न उपस्थित करतील. स्पर्धा करणारे लोक त्रस्त करतील. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा. कठीण काम सोपे नसते.

शुभ दिनांक-17, 18

वृश्चिक- कार्याला दिशा मिळेल

वृश्चिकेच्या दशमेषात सूर्य, एकादशात बुध. तुमच्या कार्याला नवी दिशा मिळेल. कठीण काम वेगाने पूर्ण करा. नोकरीत वचस्व दिसेल. धंद्याला कलाटणी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिक प्रभावशाली काम होईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती कराल. खरेदी, विक्रीत फायदा होईल.

शुभ दिनांक-15, 16

धनु- मनस्ताप देणारा काळ

धनुच्या भाग्येषात सूर्य, दशमेषात बुध. आठवडय़ाच्या शेवटी मनाविरुद्ध घटना घडेल. मनस्ताप होईल. नोकरीत प्रभाव पडेल. धंद्यात चूक नको. तुमच्या कार्याला गती मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक कोडी उलगडतील. अधिकारप्राप्ती होईल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नाराजी होईल.

शुभ दिनांक-14, 17

मकर- प्रकृतीची काळजी घ्या

मकरेच्या अष्टमेषात सूर्य, भाग्येषात बुध. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक ठरेल. वागण्या, बोलण्यात नम्रता ठेवल्यास अधिक प्रभाव पडेल. नोकरीत काम सावधपणे करा. व्यवसायात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कलाटणी देणारी घटना घडेल. प्रतिष्ठा जपा. प्रकृतीची काळजी घ्या. कोर्टाच्या कामात सावध रहा.

शुभ दिनांक-15, 20

कुंभ -स्पर्धा सोपी नाही

कुंभेच्या सप्तमेषात सूर्य, अष्टमेषात बुध. तुमच्या बोलण्या, वागण्यातून गैरसमज होईल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीतील तणाव कमी होईल. धंद्यात भागीदारासमवेत वाद होतील. कायद्याला धरून वक्तव्य करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा सांभाळा. कुटुंबात खर्च वाढेल. स्पर्धा सोपी नाही.

शुभ दिनांक -16, 17

मीन- कामात अडथळे येतील

मीनेच्या षष्ठेषात सूर्य, सप्तमेषात‘ बुध. बुद्धि चातुर्याने गोड बोलून प्रसंग हाताळा. तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न होईल. नोकरीधंद्यात व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उतावळेपणा नको. महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबात जबाबदारी वाढेल. स्पर्धा महत्त्वाची ठरेल.

शुभ दिनांक -15, 20