
सामना प्रतिनिधी । परभणी
गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव पासून जवळच असलेल्या भीमलानाईक तांड्याला आग आज दुपारी आग लागली. या आगीमध्ये 90 हजार किंमतीचा चारा जळून खाक झाला आहे.
राणीसावरगाव ग्रामपंचायत आंतर्गत भीमलानाईक तांडा येतो. या तांड्यास आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विद्युत तार तुटून ती कडब्याच्या गंजीवर पडली. बघता बघता ही आग मोठी होत जाऊन तीने रौद्ररुप धारण केले. या आगीत सुमार 90 हजार रुपयांचा 5200 कडबा जळून खाक झाला. आग अटोक्यात आणण्यासाठी येथील नागरिकांनी धाव घेतली. त्यामुळे 15 घरे आगीमध्ये भस्मसात होण्यापासून वाचली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील होणारा अनर्थ टळला. या आगीत वैजनाथ गंगाधर राठोड, विजय गंगाधर राठोड, सजंय रेखु राठोड या तिघाचे मिळून एकूण 5200 कडबा जळाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, 33 के.व्ही. विद्युत रोहित्राच्या गलथान कारभारामुळे अशा सततच्या घटना होऊन यामध्ये शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असते. या प्रकाराकडे सबंधिताने लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे. सदरील घटनेचा पंचनामा होवुन शेतकर्यांना आर्थिक सहायता मिळावी, यासाठी गंगाखेडच्या तहसलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थ वैजनाथ राठोड यानी दिली. या घटनेबाबत विद्युत कर्मचारी बाबुराव जगलपुरे यांना फोनवर संपर्क साधला असला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
























































