बिहारमध्ये मेंदुज्वराने 160 बालकांचा मृत्यू, आता इस्पितळाच्या आवारात सापडली मानवी सांगाडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुझफ्फरपूर

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये श्रीकृष्ण इस्पितळात मेंदूज्वराने आतापर्यंत 160 बालकांचा मृत्यू झाला आहे. आता त्याच इस्पितळाच्या आवारतच मानवी सांगाडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार याच भागात केले जायचे त्यांचेच हे अवशेष असेल असा प्राथमिक अंदाज आहे..

श्रीकृष्ण इस्पितळाचे अधीक्षक एस.के शाही यांनी मानवी सांगाडे मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच हा भाग शवविच्छेदन विभागाच्या अखत्यारित येत असल्याचे सांगितले. या प्रकरणी आपण प्राचार्यांनी भेटून चौकशी समिती नेमण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

तसेच याबाबत खुपच बेजबाबदारपणा झाल्याचे त्यांनी सांगितले. अंत्यसंस्काराच्यावेळी एक पोलीस कर्मचारी हजर असतो. असे असूनही मानवी सांगाडे का पडले याचा तपास झाला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.