
शिक्षक भरतीतील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर उद्या, 5 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून उपोषण करण्यात येणार आहे.
2017 मधील शिक्षक भरती समांतर आरक्षणावरील उमेदवारांवरील अन्याय दूर करावा, विभाग स्तरावरील शिक्षक भरतीचा निर्णय तत्काळ रद्द करावा, भरती टप्प्याटप्प्यात न करता एकदाच जाहिरात प्रसिद्ध करावी, केंद्रीय पद्धतीने गुणवत्ता याद्या जाहीर कराव्यात, अभ्यासक्रमात सर्व विषयाला समान प्राधान्य देण्यात यावे. राज्यातील 30 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी जाहिरात काढावी.
अभियोग्यता चाचणीची तारीख जाहीर करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करणार असल्याचे डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले.



























































