रोज दाढी करता का..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजकालच्या मालिकांचे.. चित्रपटांचे नायक पहिले तर सरसकट चेहऱ्याबरोबर दाढी ठेवण्याची स्टाइल आली आहे. यामध्ये रोज दाढी करण्याऐवजी दाढी बारीक करण्याची नवी पद्धत आली आहे. पण प्रत्यक्षात रोज दाढी करणे त्वचेसाठी लाभदायक असते. जे दररोज दाढी करतात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते.
मृत त्वचा – प्रदूषण, उन यामुळे चेहरयाच्या त्वचेला हानी पोहोचते. चेहऱ्यावर मृत पेशींचा थर निर्माण होतो. दररोज दाढी केल्याने हे मृत त्वचेचे थर निघून जातात. त्वचा निरोगी राहते.
जंतुपासून संरक्षण – दाढीच्या केसांमध्ये अनेक प्रकारचे जंतु राहू शकतात. हे जंतु चेहऱ्याच्या त्वचेला, डोळ्यांना हानिकारक असतात. त्वचेवर डाग येऊ शकतात. पण जर रोज दाढी केली तर हे सर्व धोके टाळता येतात.
पी एच लेव्हल – दररोज दाढी करताना दर्जेदार शेव्हिंग क्रीम, आफ्टर शेव्ह, जेल वापरा. त्यामुळे त्वचेची पी एच लेव्हल नियंत्रणात राहते.
दाढी करताना.. – दाढी केल्यानंतर दुध, पपईने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.