स्वस्तात मस्त! लवकरच येतोय आयफोन 17 ई तेही परवडणाऱ्या किमतीत 

ऍपल कंपनी नव्या वर्षात चाहत्यांना एक नवीन सरप्राईज देणार आहे. कंपनी आयफोन 17 ई हा नवा फोन लाँच करणार आहे. हा फोन आयफोन 17 च्या तुलनेत केवळ 60 हजार ते 65 हजारांपर्यंत मिळण्याची शक्यता असल्यामुळे कमी बजेट असणाऱया ग्राहकांना हा फोन खरेदी करता येईल. या फोनमध्ये ए19 चिपसेट, गेमिंग आणि एआय पॉवर्ड फीचर्स दिले जातील.

गुगल फोनला नव्या अपडेटमुळे नवे फीचर्स

गुगलने नव्या फीचरसाठी नवे अपडेट जारी केले आहे. अँड्रॉईड 16 क्यूपीआर2 हे अपडेट आहे. यामुळे गुगल फोनच्या पिक्सल 6 सीरिजपासून पिक्सेल 10 सीरिजपर्यंत अपडेट उपलब्ध होणार आहेत. या नव्या अपडेटमध्ये पिक्सेल 6, 6 प्रो, 6ए, पिक्सेल 7, 7 प्रो, 7ए, पिक्सेल टॅबलेट, पिक्सेल फोल्ड, पिक्सेल 8, 8 प्रो, 8ए, पिक्सेल 9, 9 प्रो, 9 प्रो एक्सएल, 9 प्रो फोल्ड, पिक्सेल 10, 10 प्रो, 10 प्रो एक्सएल, 10 प्रो फोल्ड या फोनला अपडेट मिळणार आहे.