
हिंदुस्थानी हवाई दलाच्या (IAF) आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. हवाई दलाच्या ताफ्यातील मिग-२९ (MiG-29) या लढाऊ विमानांना आता प्रगत शॉर्ट रेंज एअर-टू-एअर मिसाईल म्हणजेच आसराम (ASRAAM) क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्याची तयारी सुरू झाली आहे. यामुळे आगामी काळात ही विमाने शत्रूसाठी अधिक घातक ठरणार आहेत.
जुण्या क्षेपणास्त्रांची जागा घेणार ‘आसराम’
सध्या मिग-२९ विमानांमध्ये १९८० च्या दशकातील रशियन बनावटीची R-73 क्षेपणास्त्रे वापरली जातात. ज्यांची रेंज साधारण १० ते १५ किलोमीटर आहे. त्याऐवजी आता २५ किलोमीटरपेक्षा जास्त रेंज असलेल्या आधुनिक ‘आसराम’ क्षेपणास्त्रांचा समावेश केला जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात प्रस्ताव सादर केला असून, यामध्ये क्षेपणास्त्रांसह आवश्यक लाँचर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे.
काय आहेत ‘आसराम’ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये?
- हे क्षेपणास्त्र हीट-सिकिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामुळे ते शत्रूच्या लक्ष्याचा अचूक वेध घेते.
- एकदा डागल्यानंतर याला नियंत्रित करण्याची गरज नसते, ते आपोआप लक्ष्याचा पाठलाग करते.
- याचे वजन साधारण ८८ किलो असून लांबी २.९ मीटर आहे.






















































