कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन 3.0 सुरू आहे. मात्र अनेक राज्यात संचारबंदीबाबत सूट मिळत आहे, याचाच फायदा घेत चक्क घरी जाण्यासाठी एका महिला IAS अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. राणी नागर असे या महिला IAS चे नाव आहे.
हरयाणा कॅडरच्या महिला IAS राणी यांनी मुख्य सचिवांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. राजीनाम्यासह त्यांनी आपल्या घरी गाझियाबाद येथे परतण्यास परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला आहे.

राणी नागर या 2014 बॅचच्या IAS अधिकारी असून त्या मूळच्या उत्तर प्रदेश येथील आहे. एप्रिलमध्ये त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे अधिकारी वर्गात खळबळ उडाली होती. डिसेंबर 2019 पासून आपल्या बहिणीसोबत चंदीगड येथे गेस्ट हाऊसला राहणाऱ्या राणी यांनी 17 एप्रिलला एक व्हिडिओ शेअर केला होता. यात राणी आणि त्यांची बहीण रिमा यांनी जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.























































