
‘जोपर्यंत एखादा ब्राह्मण माझ्या मुलाला मुलगी देत नाही किंवा त्याच्याशी संबंध जोडत नाही तोपर्यंत आरक्षण सुरूच राहणार,’ असे वक्तव्य मध्य प्रदेश अनुसूचित जाती-जनजाती अधिकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष संतोष वर्मा यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
आरक्षण आर्थिक आधारावर असावे की सामाजिक आधारावर असावे अशी चर्चा सध्या सुरू आहे. आयएएस अधिकाऱयाच्या कुटुंबातील व्यक्तीला आरक्षण मिळू नये अशीही मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संतोष वर्मा बोलत होते.

























































