ICC T20 WC 2026 – हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका सामन्यात दोन सख्ख्या भावांची टक्कर, डगआऊटमध्ये रंगणार रणनीतीचे युद्ध!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये रविवारी हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर-8 फेरीतील थरार पाहायला मिळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना केवळ मैदानावरच नाही, तर डगआऊटमध्येही एका रंजक लढतीचा साक्षीदार ठरेल. याचे मुख्य कारण म्हणजे दोन सख्खे भाऊ मॉर्ने मॉर्केल आणि अल्बी मॉर्केल हे या लढतीत आमनेसामने येणार आहे.

मॉर्ने मॉर्केल सध्या हिंदुस्थानी संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील कोचिंग स्टाफचा तो महत्त्वाचा भाग आहे. 41 वर्षीय मॉर्नेने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा कणा मोडण्यासाठी नक्कीच खास रणनीती आखली असेल. मॉर्नेच्या नावावर 86 कसोटी, 117 वनडे आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 544 विकेट्स आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे तंत्र आणि त्यांच्या उणिवा यांची त्याला सखोल माहिती आहे.

दुसरीकडे, त्याचा मोठा भाऊ ४४ वर्षीय एल्बी मॉर्केल दक्षिण आफ्रिकन संघात ‘स्पेशालिस्ट कन्सल्टंट’च्या भूमिकेत आहे. अल्बीने 1 कसोटी, 58 वनडे आणि 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत 1412 धावा केल्या आणि 77 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, एल्बी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळला असून त्याला स्टीफन फ्लेमिंगसोबत काम करण्याचा मोठा अनुभव आहे. हिंदुस्थानी खेळपट्ट्या आणि टी-20 मधील रणनीती तो उत्तम रीतीने जाणतो.

ICC T20 WC 2026 – तीन ‘झिरो’ नंतरही अभिषेक शर्माचा ‘जोश’ हाय, सराव सत्रादरम्यान केलं असं काही की गंभीरलाही हसू आवरले नाही

दरम्यान, सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघ सराव करत असताना ही दोघे बंधूही एकत्र आले. यावेळी एल्बी मॉर्केल मिश्किलपणे म्हणाला, आम्ही या सामन्याबद्दल एकमेकांशी काहीही बोलत नाही आहोत. आमची आईच जास्त काळजीत आहे, कारण कोणाला पाठिंबा द्यावा हे तिला समजत नाहीये.