
30 महिन्यांत तब्बल 41 वेळा आमने सामने आलेले पाकिस्तान आणि न्यूझीलंड आता पुन्हा भिडणार आहेत, पण यावेळी सामना ‘फक्त आणखी एक’ असा नाही. सुपर एटमध्ये हा थेट प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. गटसाखळीत दोघांनी लहान संघांवर मात केली होती, पण बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांसमोर दोघांची पोलखोल झाली. न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेने चोप दिला तर पाकिस्तानला हिंदुस्थानने धडा शिकवला. त्यामुळे दोघांमध्ये सुपर एटच्या पहिल्यावहिल्या सामन्यात प्रतिष्ठsची आणि श्रेष्ठत्वाची लढाई पाहायला मिळणार.
न्यूझीलंडने चेन्नई-अहमदाबादमध्ये वेगवान गोलंदाजीवर भर दिला. पण कोलंबोच्या आर. प्रेमदासा मैदानावर त्यांचे समीकरण उलटे होणार. प्रेमदासावर फिरकीचा दबदबा असतो आणि तेच पाकिस्तानचे बलस्थान आहे. त्यामुळे कर्णधार सलमान अली आगा फिरकीचा मारा वाढवणार हे जवळपास निश्चित झालेय.
फलंदाजीत न्यूझीलंडची वरची फळी अधिक आक्रमक आहे. फिन अॅलन, टिम सायफर्ट, रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स यांनी फटकेबाज खेळय़ा केल्या आहेत. चार सामन्यांत त्यांनी केवळ 14 फलंदाज गमावलेत. यावरून त्यांच्या फलंदाजीचा अंदाज येतो.
पाकिस्तानकडे स्पह्टक फलंदाज आहेत, पण एकाकडेही सातत्य नाही. हेच त्यांचे रडगाणे आहे. सईम अयूब फॉर्म शोधतोय, बाबर आझम अजून पूर्ण क्षमतेने झळकलेला नाही. मधल्या फळीत गोलंदाज-अष्टपैलूंची तोबा गर्दी. हा संघासाठी धोका आणि संधी घेऊन फिरतोय.
ICC T20 WC 2026 – ‘सुपर एट’च्या महाभारतात अपराजितांची कुस्ती
संभाव्य संघ –
पाकिस्तान – साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान अली आगा (कर्णधार), बाबर आझम, ख्वाजा नफाय, शादाब खान, उस्मान खान (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज/फहीम अशरफ, सलमान मिर्झा, उस्मान तारिक, अबरार अहमद.
न्यूझीलंड – टीम सायफर्ट (यष्टिरक्षक), फिन अॅलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्प चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सॅण्टनर (कर्णधार), जिमी निशाम, मॅट हेन्री, इश सोढी, जेकब डफी.


























































