
अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने बुधवारी (18 फेब्रुवारी 2026) नेदरलँडविरुद्ध धमकेदार खेळी केली. त्याच्या 66 धावांच्या अमुल्य योगदानामुळे टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड निर्माण झाली. मधल्या फळीत फलंदाजी करताना शिवम दुबेने लौकिकाला साजेसा खेळ केला असून संघालाही त्याचा वेळोवेळी फायदा झाला आहे. शिवन दुबेने आपल्या या आक्रमक आणि संयमी फलंदाजीचं श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला दिले आहे.
नेदरलँडला पराभवाची धुळ चारल्यानंतर शिवम दुबेने Jio Hotstar वर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्याने महेंद्र सिंग धोनीचे विशेष कौतुक केले. क्रिकेटर म्हणून कारकिर्दीला सुरुवात करताना वेगवान गोलंदाजांचा सामना करताना संघर्ष करावा लागल्याचही त्याने यावेळी नमुद केलं. हा संघर्ष सुरू असताना महेंद्र सिंग धोनीचा कानमंत्र त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याच त्याने यावेळी सांगितलं. तो म्हणाला की, “जेव्हा मी पहिल्यांदा IPL मध्ये आलो, तेव्हा मला वेगवान गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करताना संघर्ष करावा लागत होता. त्यावेळी मला जाणवलं की, अशा परिस्थिती वर्चस्व गाजवाययंच असेल तर मला त्यावर काम करावं लागेल.” यासाठी शिवम दुबेने खूप मेहनत घेतली तसेच महेंद्र सिंग धोनीने दिलेल्या सल्ल्याचाही त्याने यावेळी आवर्जून उल्लेख केला.
“माही भाईंनी मला सांगितले की प्रत्येक वेळी षटकार मारण्याची आवश्यकता नाही. संधी मिळाली की, चौकार मारणे आणि स्ट्राइक रोटेशन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याच्या सल्ल्याने मला चांगली मदत झाली. त्यामुळे मी आता चांगला चेंडू मिळाला तर चौकार मारण्याचा किंवा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतो. हाणामारीच्या षटकांमध्ये मी स्वाभाविगत वेगवान फलंदाजी करतो.” असं शिवम दुबे म्हणाला आहे.
जम्मू-कश्मीरची हिमालयासारखी कामगिरी, प्रथमच रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत
“मला फलंदाजी करताना दबाव जाणवत नाही. मी सामन्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असतो. जर विकेट पडल्या तर माझी जबाबदारी वाढते आणि टीकून फलंदाजी करण्यावर माझा फोकस असतो. मी मधल्या षटकांमध्ये जोखीम घेण्याच टाळतो. कारण मला माहित आहे की, मी शेवटपर्यंत खेळत राहिलो तर मी शेवटच्या षटकात 10 ते 15 धावा काढू शकतो. संयमाने खेळून स्ट्राईक रोटेट करण्यावर माझा भर असतो. पण चर सर्व काही सेट असेल तर मी पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात करतो.” असं शिवम दुबे म्हणाला आहे.
























































