विराट कोहली पुन्हा नंबर वन,पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीचा स्मिथला फटका

719

‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने Virat Kohli  याने ICC च्या ताज्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज केले. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची Steve Smith दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खराब कामगिरी झाल्याचा फटका त्याला या नव्या क्रमवारीत बसला.

विराट कोहली 928 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला. स्मिथच्या खात्यात 923 गुण असल्याने त्याची अव्वल स्थानावरून घसरण झाली. पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीचा फटका स्टीव्ह स्मिथला बसला. दुसरीकडे विराट कोहीने बांगलादेशविरुद्ध चांगली फलंदाजी केल्याने त्याला त्याला फायदा झाला. टॉप-10 फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा चौथ्या, तर अजिंक्य रहाणे सहाव्या क्रमांकावर आहेत. अजिंक्य रहाणेला एका स्थानाचा फटका बसलाय. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 877 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्ध ऍडलेडमध्ये झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात नाबाद तिहेरी शतकी खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला 12 गुणांचा फायदा झाला. वॉर्नर कसोटी क्रमवारी मोठी झेप घेत पाचव्या स्थानावर विराजमान झाला. नव्या गोलंदाजी क्रमवारीत हिंदुस्थानच्या मोहम्मद शमीने टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. 771 गुणांसह शमी दहाव्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. अव्वल दहा गोलंदाजांमध्ये हिंदुस्थानचे तीन गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह पाचव्या, तर रविचंद्रन अश्विन नवव्या स्थानावर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या