धवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

वर्ल्डकप 2019 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये मॅनचेस्टरमध्ये लढत होणार आहे. या लढतीत टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनच्या जागी अष्टपैलू विजय शंकरला स्थान देण्यात आले आहे. शिखर धवनच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

मॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना शिखर धवनच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो संघातून बाहेर फेकला गेला आहे. धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंत मॅनचेस्टरला पोहोचला असला तरी त्याला संघात आणि ड्रेसिंग रुममध्ये जागा मिळालेली नाही. धवनच्या जागी अष्टपैलू खेळाडू विजय शंकर की यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु अष्टपैलू विजय शंकरच्या नावावर आता मोहोर उमटली आहे.

हिंदुस्थानचा संघ –
रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिका पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

आपली प्रतिक्रिया द्या