IDCA टी-10 महिला कर्णबधीर प्रीमियर लीग 2025 च्या दुसऱ्या हंगामाला मुंबईत सुरुवात

IDCA टी-10 महिला कर्णबधीर प्रीमियर लीग 2025 च्या दुसऱ्या हंगामाला मुंबईत सुरुवात झाली. मुंबई पोलीस जिमखाना क्रिकेट मैदानावर 7 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. दक्षिण आशियाचे महामहीम व्यापार आयुक्त आणि पश्चिम हिंदुस्थानातीस ब्रिटीश उपउच्चायुक्त हसजिंदर कांग यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

सोमवारी मुंबई स्टार्स आणि बंगळुरू बादशाहा यांच्यातील उद्घाटन सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली. स्पर्धेत 10 लीग सामने होईल. 7 आणि 8 जानेवारीला प्रत्येकी चार सामने आणि त्यानंतर 9 जानेवारी रोजी अंतिम सामन्यासह तीन सामने रंगतील.

स्पर्धेतील विजेत्या संघांना 1 लाख, तर उपविजेत्यांना 50 हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. यासह विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तीक पुरस्कारही दिले जाणार आहेत. ही स्पर्धा IDCA.TV च्या YouTube चॅनेलवर पाहता येईल.

या स्पर्धेतील पाच संघ

– डेफ मुंबई स्टार्स – कर्णधार अल्पना सरफरे, मुख्य प्रशिक्षक अजिता वडाळदेकर

– डेफ दिल्ली बुल्स – कर्णधार काजल धवन, मॅनेजर ज्योती जैन

– डेफ हैदराबाद ईगल्स – कर्णधार ज्योष्ना, सहाय्यक प्रशिक्षक सागरकांता सेनापती

– डेफ बंगळुरु बादशाह – कर्णधार फौजिया खानम, मॅनेजर सत्या मूर्ती

– डेफ यूपी वॉरियर – कर्णधार प्रियांशी दीक्षित, व्यवस्थापक आशु दीक्षित