‘सीईटी’ देणाऱया विद्यार्थ्यांसाठी आयडॉलच्या नवीन तारखा

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) 2, 3 व 4 नोव्हेंबर रोजी विधी व बीपीएड या सीईटी परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी 6, 7 व 9 नोव्हेंबर या दिवशी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन केले आहे. या दिवशी आयडॉलच्या तृतीय वर्ष बीए, बीका@म व एमए या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत.

विद्यार्थ्यांनी आयडॉलने दिलेल्या [email protected] या ई-मेलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्रदेखील ई-मेलवर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे नाव, परीक्षेचे नाव, आसन क्रमांक, ई-मेल, मोबाईल क्रमांक व परीक्षा देणाऱया पेपरचे नाव इत्यादी माहिती ई-मेलमध्ये देण्यात यावी. यानुसार या विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या