
ICC ने बांगलादेशी संघाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. राजकीय तणाव आणि सुरक्षेच्या कारणास्तलव हिंदुस्थानातील आमच्या संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, अशी मागणी बागंलादेश क्रिकेट बोर्डाने ICC कडे केली होती. त्यावर ICC ने हिंदुस्थानातील कोणतेही ठिकाण सामन्यांसाठी निवडा, असा पर्याय ICC ने बांगलादेशला दिला होता. या सर्व घडामोडींमुळे विश्वचषकातील बांगलादेशच्या समान्यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता ICC ने कठोर भूमिका घेत हिंदुस्थानातच सामने खेळा, अन्यथा बाहेर पडा, असा अल्टिमेटम बांगलादेशला दिला आहे. तसेच यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी २१ तारखेपर्यंत वेळ दिली आहे. ICC च्या अल्टिमेटममुळे एका संघाला लॉटरी लागण्याची म्हणजे वर्ल्डकपमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळण्याची शक्यता आहे.
आयसीसीने बांगलादेशला २१ जानेवारीपर्यंत भारतात येऊन २०२६ चा टी-२० विश्वचषक खेळण्याचा किंवा बाहेर पडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश श्रीलंकेत सामने खेळण्यावर ठाम आहे, तर आयसीसी वेळापत्रक बदलण्यास तयार नाही. जर बांगलादेशने लवकरच आपला निर्णय बदलला नाही, तर त्याऐवजी एका संघाचा वर्ल्डकपमध्ये समावेश आहे.
टी-२० विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त दोन आठवडे शिल्लक असताना, गेल्या तीन आठवड्यांपासून बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. बांगलादेशने सातत्याने आपले सामने हिंदुस्थानऐवजी श्रीलंका किंवा पाकिस्तानमध्ये खेळवण्याचा आग्रह धरला आहे. परंतु आता आयसीसीने बांगलादेशला कडक अल्टिमेटम दिला आहे. आयसीसीने स्पष्टपणे सांगितले आहे की बांगलादेशने टी-२० विश्वचषक सामने हिंदुस्थानातच खेळावेत, अन्यथा बाहेर पडावे. आयसीसीने बांगलादेशला २१ जानेवारीची अंतिम मुदत दिली आहे. आयसीसीने स्पष्ट केले आहे की जर बांगलादेशने भारतात येण्यास नकार दिला तर त्याच्या जागी दुसरा संघ समाविष्ट केला जाईल. याचा अर्थ बांगलादेश विश्वचषकातून बाहेर पडेल. जर बांगलादेश बाहेर पडला तर एका संघाचा विश्वचषकात समावेश होऊ शकतो.
बांगलादेशने आयसीसीच्या विनंतीचे पालन केले नाही, तर स्कॉटलंडला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणार आहे. आयसीसी टी-२० क्रमवारीत बांगलादेश ९व्या क्रमांकावर आहे, त्यानंतर अफगाणिस्तान, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स आहेत. तथापि, हे सर्व संघ विश्वचषकाचा भाग आहेत. स्कॉटलंड १४ व्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ असा की जर बांगलादेश बाहेर पडला तर आयसीसी विश्वचषकात स्कॉटलंडला संधी देण्याची शक्यता आहे.
लॉजिस्टिक्स, प्रसारण आणि तिकिटे या कारणांमुळे आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळली आहे. तसेच हिंदुस्थानात बांगलादेशी संघाला कोणताही धोका नसल्याचे आयसीसीने म्हटले आहे. आयसीसीने बांगलादेश आणि आयर्लंडचे गट बदलण्याचा प्रसत्वाही फेटाळला आहे. गट बदलल्याने प्रसारक, तिकीट भागीदार आणि इतर संघांसोबत मोठा वाद निर्माण होईल, असे आयसीसीने म्हटले आहे.



























































