असं झालं तर… बँक खातेधारकाचा मृत्यू झाल्यास…

बँकखातेदाराचा मृत्यू झाल्यास, त्या खात्यातील पैसे नियुक्त वारसाला (नॉमिनी ) मिळतात. जर नॉमिनीचे नाव दिलेले नसेल, तर कायदेशीर वारसदाराला काही कागदपत्रांच्या आधारे पैसे मिळतात. नॉमिनीने मृत व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत आणि स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासह बँकेत अर्ज करावा लागतो.

मृत्यू प्रमाणपत्राची प्रत, मृत व्यक्तीचे पासबुक किंवा स्टेटमेंट, नॉमिनीचे ओळखपत्र, वारसा प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात. खाते संयुक्त असेल आणि हयात असलेल्या व्यक्तीच्या नावावर असेल, तर हयात असलेल्या व्यक्तीला खात्याची पूर्ण मालकी मिळते.