सुपरस्टार रजनीकांतची भाजपशी जवळीक वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चेन्नई

जर १९ पक्ष एका पक्षाविरोधात एकवटत असतील तर सांगा ताकदवान कोण ? असा प्रश्न विचारत अभिनेता रजनीकांत याने भाजपशी त्याची सलगी वाढत चालल्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी रजनीकांत याने पत्रकारांशी बोलताना भाजप हा विरोधकांसाठी धोकादायक आहे असं विधान केलं होतं.

यावेळी बोलताना त्याने नोटाबंदीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही अशीही टीका केली होती. कालच्या विधानावरून वाटायला लागलं होतं की रजनीकांत हा भाजपविरोधी आहे की काय, मात्र मंगळवारी केलेल्या विधानामुळे तो भाजपच्या जवळ जाऊ लागल्याचे संकेत मिळायला लागले आहेत.

रजनीकांत याने गेल्या वर्षी राजकारणात उतरणार असल्याची जाहीर घोषणा केली होती. रजनीकांत यांनी एक संघटना चालू केली असून त्याचं नाव रजनी मक्कल मंद्रम असं ठेवलं आहे. च्या चाहत्यांना वाटतंय की १२ डिसेंबरला म्हणजेच त्याच्या वाढदिवशी या पक्षाची घोषणा केली जाईल.  रजनीकांत याने आत्तापर्यंत अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची तारीफ केली आहे. गेल्या वर्षी रजनीकांत आणि मोदींची भेट बरीच गाजली होती. या भेटीनंतर त्याच्या मोदीप्रेमाची जाहीरपणे चर्चा व्हायला लागली होती.