मुलींच्या शिक्षणासाठी आयएचसीएलचा पुढाकार

प्रातिनिधिक फोटो

मुंबईतील कोळीवाडा आणि मच्छीमार नगर या भागातील वस्त्यांमधील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळवताना सतत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते. ही तफावत दूर करण्यासाठी आयएचसीएलने योजक या संस्थेच्या सहकार्याने ‘गर्ल चाईल्ड कम्युनिटी लर्निंग प्रोग्रॅम’ सुरू केला आहे.

टाटा अफर्मेटिव अॅक्शन फ्रेमवर्कच्या अनुषंगाने इंडियन हॉटेल्स पंपनीतर्फे (आयएचसीएल) योजक (यूथ ऑर्गनायझेशन फॉर जॉइनिंग अॅक्शन अॅण्ड नॉलेज) या संस्थेच्या सहकार्याने पहिली ते दहावीतील मुलींसाठी शैक्षणिक आणि विकासात्मक सहाय्य करणारा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शैक्षणिक विषयांसोबतच जीवनकौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. आयएचसीएलच्या मनुष्यबळ विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष गौरव पोखरियाल म्हणाले, ‘गर्ल चाईल्ड कम्युनिटी लर्निंग प्रोग्रॅम’ हा शिक्षण आणि सर्वांगीण विकासाद्वारे मुलींना सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.