आयटीआयच्या 24 टक्के जागा भरल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
powai-iit-building

सामना ऑनलाईन । मुंबई

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधील प्रवेशाच्या फेऱ्या बुधवारपासून सुरू झाल्या. बुधवारी झालेल्या पहिल्या फेरीत एकूण जागांपैकी सुमारे 24 टक्के जागा भरल्या गेल्या. पहिल्या प्रवेश फेरीअखेरीपर्यंत 33,837 जागा भरल्या गेल्या. त्यातील 27,141 जागा या सरकारी आयटीआय संस्थांमधील आहेत तर 6696 जागा या खासगी आयटीआय संस्थांमधील आहेत. राज्यातील आयटीआय संस्थांमध्ये 1,41,878 जागा उपलब्ध आहेत. सरकारी आयटीआयमध्ये 92,706 आणि खासगी आयटीआयमध्ये 49,172 जागा आहेत.