PCOS असलेल्या महिलांना ‘या’ समस्येचा सामना करावा लागू शकतो, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेक मुलींना आणि महिलांना PCOD आणि PCOS सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अलीकडे या समस्यांनी ग्रस्त असलेल्या मुलींची आणि महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. PCOD आणि PCOS च्या समस्यांमुळे महिलांची मासिक पाळी अनियमित होते. यामुळे जळजळ, अंडाशयाच्या तक्रारी अधिक प्रमाणात वाढतात. PCOS रुग्णांमध्ये वजनवाढीची समस्या ही फार मोठ्या प्रमाणावर भेडसावते. त्यामुळेच PCOD आणि PCOS समस्यांना तोंड देताना शारीरीक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

अभ्यासांती असे आढळून आले की, पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये इन्सुलिनचे चयापचय तसेच सेक्स हार्मोन्समधील पातळी ही अधिक असते. यामुळे लक्ष केंद्रीत करण्यावर फार परिणाम होतो.

How Stress Can Make You Sick

आपल्या रोजच्या जीवनात एकाग्रता ही फार महत्त्वाची मानली जाते. एकाग्रतेमुळे आपण सहज गोष्टी साध्य करु शकतो. परंतु  पीसीओएस असलेल्या महिलांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत असल्याचे निदर्शनास येते. मनाची द्विधा अवस्था असल्यामुळे कुणाशीही संवाद साधताना त्यांच्यावर खूप बंधने येतात.

Even minor stress can impact long-term health, study warns

कामात एकाग्रता नसल्यामुळे त्यांना एकावेळी अनेक कामे करणे कठीण होते. तसेच त्यांच्या निर्णय क्षमतेवरही परिणाम होतो. यासाठी दररोज योग्य आहार आणि आहाराच्या वेळा निश्चित करणे गरजेचे आहे. तरच तुम्ही PCOS सारख्या समस्येवर मात करू शकता.

तुम्हीदेखील PCOS प्राॅब्लेमने त्रस्त आहात का! मग हे पदार्थ खाणे टाळावे