आयटीआयसाठी ऑनलाइन अॅडमिशन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 967 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) 1 लाख 49 हजार 296 जागांसाठी ऑगस्ट 2021 सत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी आयटीआय संस्थांमध्ये 93816 तर खासगी आयटीआय संस्थांमध्ये 55480 जागा उपलब्ध आहेत. सर्वाधिक 31196 जागा पुणे विभागात असून त्यापाठोपाठ मुंबई विभागात 20648 जागा उपलब्ध आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून ही माहिती देण्यात आली. राज्यात 427 सरकारी तर 550 खासगी आयटीआय संस्था आहेत. प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइनच राबवण्यात येणार असून संचालनालयाच्या admision.dvet.goved.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी अर्जासह माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज मोबाईल अॅपच्या आधारे भरण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.