अलिबागमधील रेवदंडा येथील चार जणांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्लंघन करून स्थानिक तसेच उद्योगपती, अभिनेते यांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहे. याबाबत अलिबागमधील 58 स्थानिकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार अलिबाग महसूल विभागाकडून 15 दिवसांपूर्वी पाच स्थानिकांच्या वाढीव बांधकामांवर कारवाई केली होती. आज शनिवारी रेवदंडा येथील चार जणांच्या अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने बुलडोझर फिरवला आहे. त्यामुळे पुन्हा अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

अलिबागमधील 58 स्थानिकांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रांताधिकारी यांनी कारवाईची नोटीस पाठवली होती. त्यानुसार 15 दिवसांपूर्वी नागाव येथील 5 जणांच्या अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अलिबागमधील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन स्थानिकावरील कारवाई थांबविण्यासाठी निवेदन दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या