
टिटवाळा येथील बेकायदा बांधकामांना उपमहापौर उपेक्षा भोईर यांचे अभय असून पालिकेने भाजपचे कार्यालय तोडल्याने त्यांनी संतप्त होऊन उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे टिटवाळा येथील बेकायदा बांधकामांची चौकशी करून त्यात उपेक्षा भोईर यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने आयुक्तांकडे केली आहे.
प्रशासन सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाखाली काम करत असून भाजपचे ऐकत नाही, नगरसेवक निधीच्या फाईल मंजूर होत नाहीत, असा राग आळवत महासभेत उपेक्षा भोईर यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांचे राजीनामानाटय़ टिटवाळा येथील नागरिकांनी उघडे पाडले होते. युवासेनेचे सहसचिक ऍड. जयेश काणी, नरेश पाटील यांनीही उपेक्षा भोईर यांच्या कार्यकाळात बेकायदा बांधकामे फोफावली असून त्यांनी किती केळा बेकायदा बांधकामाबाबत तक्रारी केल्या याची माहितीच पालिकेकडे मागितली आहे.
आम्हाला बदनाम करू नका!
शिवसेना गटनेते दशरथ घाडीगाककर यांनी उपमहापौरांच्या बेकायदा बांधकामांकर पालिकेने कारवाई केल्याने त्यांनी नाहक शिवसेनेला बदनाम करू नये असा इशारा दिला आहे. यावेळी घाडीगावकर यांनी सांगितले की, उपमहापौर भोईर यांचे पती शक्तिकान भोईर यांच्या नावे सातबारा उतारा असलेली जागा आहे. या जागेवर रुपेश भोईर यांनी बांधकाम केले होते. ही बाब प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस बंदोबस्त मागवून बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई केली. या कारकईमुळे उपमहापौर संतप्त झाल्या.
चौकशी करा!
यासंदर्भातील सर्व कागदपत्रे घाडीगावकर यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना सादर केली असून टिटवाळा येथील बेकायदा बांधकामांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
























































