
सामना प्रतिनिधी । नगर
शेंडी बायपास रस्त्यावरून मद्याची तस्करी करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. त्यातून साडेसोळा लाखांची दारू, टेम्पो असा सुमारे 19 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भगवान बन्सी बढे (वय-४० वर्षे, रा. भिलवडे. ता – पाथर्डी, जि- नगर) यांना अटक करण्यात आली आहे.
रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहीतीवरून सापळा रचला असता विदेशी दारुने भरलेला एक सफेद रंगाचा टेम्पो ( एमएच-२०बीएस-११५८) एमआयडीसी शेंडी बायपास रोडवर पकडण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्सपेक्टर सचिन खामगळ, कर्मचारी सोन्याबापू नानेकर, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, मन्सूर सय्यद, रवींद्र कर्डिले, राम माळी, संतोष लोढे, राहूल सोबँके, विजय ठोंबरे, सचिन अडबल, रवि सोनटक्के, विजय वेठेकर आदींनी ही मोहीम यशस्वी पार पाडली.
या टेम्पोमध्ये असलेली १६ लाख ४१ हजार ६०० रुपये किंमतीची दारु, त्यामध्ये व्हाईट मिस्चीफ वोडका, ब्लॅक डिलक्स व्हिस्की, डॉक्टर स्पेशल हिस्कीचे एकूण २५६ बॉक्स व ३ लाख रूपये किमतीचा टेम्पो असा एकूण १९ लाख ४९ हजार ६०० रु. कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.





























































