Weather Forecast Maharashtra – राज्यात पाच दिवस तुफान पाऊस! कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

राज्यात येत्या १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकणात याचा तीव्र परिणाम दिसेल.

आज मुंबई, ठाणे, रायगड आणि नाशिकसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे, तर उद्या संपूर्ण कोकण विभागासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत अतिवृष्टीमुळे पूर, भूस्खलन आणि वाहतूक व्यवस्थेत अडथळे येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.