खजूर : ताकद… ऊर्जा!

तारुण्य टिकवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी खजूर खाणे गुणकारी ठरते. खजूर खाल्ल्याने शरीरात ताजेपणा येतो. मेंदू, हृदय, कंबर या अवयवांना बळ मिळते, कांती सुधारते, त्वचा उजळ होते. अशा सर्वगुणसंपन्न खजुराचे आहारातील महत्त्व पाहूया.

> खजुरामधील लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियममुळे हाडांची वाढ होते. पाठीचा कणा, सांधेदुखी, कंबरदुखी असे त्रास दूर होतात.

> नैसर्गिक साखर खजुरात जास्त प्रमाणात असते. त्यामुळे दररोज दोन ते चार खजूर खाल्ले तरी ऊर्जा मिळते.

> देहयष्टी किरकोळ असेल आणि वजन वाढत नसेल तर खजूर खा. वजन वाढण्यासाठी मदत होईल.

> आजारपणामुळे रुग्णांना अशक्तपणा येतो. अशावेळी खजूर खावेत. यामुळे ताकद वाढून शरीराला पोषण मिळते.

> खजूर खाल्ल्याने मज्जासंस्था मजबूत होऊन त्यांचे आरोग्य वाढते आणि रक्ताची कमतरताही दूर होते.

> अपचनाच्या त्रासावर उपाय म्हणून खजूर खा. कारण यामध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अन्नपचन व्हायला मदत होते. रात्री चार खजूर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर खा. यामुळे पोट साफ होते. भूक वाढते.

> चेहऱयावरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा उजळ होण्यासाठी खूजर खाणे चांगले.