व्यायाम प्रत्येकासाठी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मधुकर दरेकर, पॉवरलिफ्टिंग

फिटनेस म्हणजे? – आरोग्य उत्तम राहण्यासाठी केला जाणारा व्यायाम.

पॉवरलिफ्टिंग की आरोग्य? – सगळ्यात आधी आरोग्य. कारण ते उत्तम असेल तरच कोणताही खेळ खेळता येतो. पॉवरलिफ्टिंग हा खेळ सर्व खेळांसाठी चांगला आहे.

डाएट की जीवनशैली? – जीवनशैली. ती जर का नीट असेल तर डाएट नीट होईल.

सामान्य माणसासाठी फिटनेस? – अर्धा तास चालणे, फ्रीहॅण्ड एक्सरसाइज करणे आवश्यक आहे.

व्यायाम कसा करावा? – प्रत्येकाने आवडेल, जमेल असाच व्यायाम करावा. आवश्यक त्या खेळाला पूरक असा व्यायाम करावा.

व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता? – खेळाच्या स्पर्धा करायच्या असतील तर तसा व्यायाम आणि त्या खेळासाठी आवश्यक डाएट करावा.

पॉवरलिफ्टिंग म्हणजे दिसणं, आरोग्य की स्पर्धा? – सगळ्यात आधी आरोग्य… ते उत्तम असेल तर पॉवरलिफ्टिंग खेळता येते आणि आपल्या चांगल्या कामगिरीतून दिसणं हे येतंच.

दिवसातून  किती पाणी प्यावे? – पाणी सर्वांनीच प्यायला हवे. दिवसभरात किमान चार लिटर पाणी प्यावे.

व्यायामाला किती वेळ देता? – दोन तास.

जिमला जायला न मिळाल्यास काय करता? – घरीच एक तास फ्रीहॅण्ड एक्सरसाइज आणि वेगवेगळी आसने करतो.

बाहेर गेल्यावर डाएट कसा सांभाळता? – बाहेर गेल्यावर तेलकट, मसालेदार पदार्थ खात नाही. फळं, सॅलेड आणि शाकाहारी जेवणावर भर देतो.

कोणता पदार्थ नियमित खाता? – दूध, खजूर, पालेभाज्या, कडधान्ये, ड्रायफ्रुट्स.

फिटनेस मंत्र – प्रत्येकाने व्यायाम केलाच पाहिजे. व्यायाम तुम्हाला जमेल तो करा, आपल्या वयाप्रमाणे त्याचा सराव करा. रोज एक तास व्यायाम करा आणि शक्यतो घरगुती पदार्थ खावेत.