जगभरातून बातम्यांचा थोडक्यात आढावा

न्यूझीलंडमध्ये द्रौपदी मुर्मू यांचे शाही स्वागत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे न्यूझीलंडमध्ये शाही स्वागत करण्यात आले. याआधी मुर्मू यांनी वेलिंग्टन रेल्वे स्टेशनवरील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला अभिवादन केले. मुर्मू यांनी न्यूझीलंडचे गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो आणि उपपंतप्रधान विन्सटन पीटर्स यांची भेट घेत दोन्ही देशांतील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. मुर्मू यांनी न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण संमेलनाला संबोधित केले.

 

वायनाडमध्ये शोध मोहीम सुरूच…

केरळ राज्यातील वायनाड जिह्यात 30 जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात 413 जणांचा मृत्यू झाला असून 152 लोक अजूनही बेपत्ता आहेत. वायनाडमध्ये सहा वेगवेगळय़ा ठिकाणी शोध मोहीम 24 तास अद्याप सुरू आहे. या मोहिमेत 1100 हून अधिक जवान, वन विभाग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दलातील जवान, 84 हिताची, पाच जेसीबी आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. सातव्या दिवशी सहा मृतदेह सापडले आहेत.

 

युव्रेनचे लष्कर रशियात घुसले; पुतीनकडून अॅलर्ट

अडीच वर्षांपासून रशिया आणि युव्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे, परंतु पहिल्यांदाच युव्रेनचे सैन्य रशियात घुसले आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना हा मोठा झटका मानला जात आहे. युव्रेन दोन दिवसांपासून रशियातील अनेक भागात जोरदार हल्ला करत आहे. रशियाचे सैन्यसुद्धा या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.

 

भूपंपाच्या धक्क्यांनी जपान हादरला

जपानमध्ये पुन्हा एकदा भूपंपाचे जोरदार धक्के बसले. दक्षिणी जपानच्या क्यूशी परिसरात भूपंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी होती. भूपंपानंतर अधिकाऱयांनी त्सुनामीचा अॅलर्ट जारी केला. भूपंपाच्या धक्क्यांनी शॉपिंग
मॉलमधील सामान, खुर्च्या, पंखे, टेबल हलत होते. जपानमध्ये दोन भूपंपाचे धक्के बसले.