महत्त्वाच्या बातम्या – रामनवमीनिमित्त डोंबिवलीत शास्त्री नगर श्री राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामनवमीचे औचित्य साधून शास्त्रीनगरच्या श्री राम मंदिरात सकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंत विविध धार्मिकः कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीनिवास काळीकर यांचे कीर्तन झाले. तसेच सुरसंगम भजनी मंडळाचे भजन, हरिपाठ, बुवा गौरव पांचाल विरुद्ध सुषा प्रचीण सुतार यांची डबलबारी असे कार्यक्रम पार पडल्याची माहिती परशुराम म्हात्रे यांनी दिली.

टेम्पोला आग

खालापूर: चोरघाटातील डेकू गावाजवळ रेम्पोला आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दलाचे जवान, बोरघाट मदत केंद्राचे पोलीस आणि अपघातग्रस्त टीमने घटनास्थळी धाव घेतली, अवघ्या काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. टेम्पोचे लावतर गरम झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

मॉलमध्ये आगडोंब
ठाणे: विवियाना मॉलच्या तळमजल्यावरील ओला कच्च साठवण्याच्या खोलीत आगडोंब उसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कापत्ती व्यवस्थापन कक्षाला आगीची माहिती मिळताच घटनास्थली मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे जवान दाखल झরোধী, ४० मिनिटांच्या अथक प्रयत्नांतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

सोनसाखळी लंपास
ठाणे: दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सोनसाखळी लंपास मेल्याची घटना बोकाळी परिसरात घडली आहे. फोल शेत रोड येथे राहणारे अधिषेक खंडेलवाल डे फार पार्क करून एका दुकानात गेले, दुकानातून परत गाडीजवळ आले असता दुचानांवरून आलेल्या चोरट्यांनी लांच्या गळ्यातील एक लाखाची सोनसाखळी चोरून नेली.

कफ सिरप जप्त
ठाणे: तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणाच्या कफ सिरपच्या १२० बाटल्या जप्त करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश आले आहे. बेकायदेशीररीत्या कोडीनयुक्त कफ सिरप विक्री करणाऱ्या तस्कराला खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद सय्यद असे अटक आरोपीचे नाव आहे.