वडाच्या झाडाबाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी

वड हा हिंदुस्थानी उपखंडामध्ये आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. फायकस या प्रजातीमध्ये मोडणारी वड ही बेंगालेन्सिस नावाची जात आहे. हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. महत्त्वाचं म्हणजे या वडाला ज्या पारंब्या फुटतात त्या जमिनीपर्यंत पोहचतात. या जमिनीपर्यंत पोहचून त्यांना खोडांचा आकार येतो आणि मग त्या खोडांचा विस्तार होत जातो. वडाच्या पानाचा उपयोग जेवणासाठी पत्रावळींसाठी करतात. तसंच याची मुळे, पाने, फुले आणि चीक तसंच साल या सगळ्याचा उपयोग औषध म्हणून करण्यात येतो. इतकंच नाही तर त्याचे केशवर्धक म्हणूनही करतात. तसंच याच्या पारंब्या शिकेकाईमध्ये घालून पाणी उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास, केसांच्या वाढीसाठी उपयोग होतो. त्यामुळे वडाच्या झाडांमध्ये पोषक तत्व असतात.

पूर्ण वाढलेले वडाचे झाड हे एका तासाला साधारण सातशे बारा किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते
वडाच्या झाडाखाली तुम्ही जितक्या जास्त वेळ बसता तितका जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन तुम्हाला मिळतो
वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होमहवनामध्ये आणि यज्ञामध्ये समीधा म्हणून करण्यात येतो. तसंच वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानामधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो. त्यामुळे या वृक्षाला अक्षयवट असं म्हणतात. त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं
वडाची उंची साधारण तीस मीटरपर्यंत असते. तसाच हे झाड सदापर्णी आहे. अर्थात हे झाड कधी सुकत नाही.
वडाचा चीक हा दातदुखी, संधीवात तसंच तळपायाच्या भेगांवर फायदेशीर ठरतो
वडाच्या सालीचा काढा हा मधुमेहावर गुणकारी ठरतो. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही नियमित हा काढा करून प्या. लवकरच तुमचा मधुमेहाचा आजार दूर होईल
विंचवाचे विष काढण्यासाठीही तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. तसंच पायावर भिंगरी अथवा चिखल्या झाल्यास, तुम्ही वडाचा चीक लावू शकता
तुमच्या शरीरात अचानक लचक भरल्यास किंवा सांधे दुखत असल्यास, वडाची पानं लावून थोडी गरम करून लावल्यास, त्या दुखणाऱ्या भागावर लावा. असं केल्याने सांधे मोकळे होऊन बरे होतात
ताप कमी होण्यासाठी वडाच्या झाडाच्या पारंब्यांचा रस देतात. यामुळे घाम येऊन शरीरातील ताप निघून जाण्यास मदत होते
पोटात जंत झाल्यास, पारंब्याचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देण्यात येतो. तसंच तुम्हाला आव अथवा अतिसार झाल्यास, तुम्ही ताकामध्ये मिसळून हे घेतल्यास लवकर बरं होतं