पती निघाला नपुंसक, बायको गेली सोडून तर बापाचा केला खून

3860
murder-knife

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पती नपुंसक निघाला. त्यामुळे त्याची बायको सोडून गेली. त्याचा राग मनात धरून पतीने आपल्या वडिलांचाच खून केला आहे.  या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

उत्तर प्रदेशमध्ये ललित या तरुणाचे पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते. परंतु तो नपुंसक असल्याने त्याची बायको त्याला सोडून गेली. ही बातमी गावात पसरल्यानंतर गावातील लोक त्याला टोमणे मारायाला लागले. नंतर ललितचे वडील रामभूल यांनी इलाज केला. उपचारानंतरही लिलितमध्ये काही सुधारणा झाली नाही. नंतर गावातल्या लोकांनी ललितचे कान भरले. तुझ्या वडिलांनीच तुला नपुसंक केले असे काही जणांनी त्याला सांगितले.

शुक्रवारी ललित आपल्या वडिलांच्या खोलीत झोपला. नंतर धारदार हत्याराने वडिलांचा खून करून फरार झाला. सकाळी रामभूल यांच्या दुसर्‍या मुलाने पाहिले की वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तपास केला असता ललितने खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच कसून शोध घेतला तेव्हा त्याने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांने ललितला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या