इम्रान खान यांच्या पहिल्या पत्नीचा गौप्यस्फोट, बेडरूममधील खासगी गोष्टी केल्या सार्वजनिक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पहिली पत्नी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान खान समलैंगिक असल्याचा आरोप करणाऱ्या रेहम खान यांनी यावेळेस थेट बेडरूममधील खासगी गोष्टी उघड केल्या आहेत. पाकिस्तानी युट्युबरसोबत मुलाखतीत रेहम खान यांनी इम्रान खान यांच्या लैंगिक क्षमतेवर विधान केले. पहिल्या पतीपेक्षा इम्रान खान यांचा ‘सेक्‍सुअल परफॉर्मन्स’ यथातथाच होता, असे रेहम खान म्हणाल्या.

पाकिस्तानचा प्रसिद्ध युट्युबर वकार जाका यांच्यासोबत मुलाखतीत रेहम खान यांनी आपल्या पुस्तकाबाबत प्रशांची उत्तरे दिली. याच मुलाखतीत त्यांना इम्रान खान यांच्या लैंगिक क्षमतेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रेहम खान यांनी बिनधास्त उत्तर दिले. पहिल्या पतीपेक्षा इम्रान खान यांचा परफॉर्मन्स काही खास नव्हता, असे त्या म्हणाल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तानात धुमाकूळ घालत आहे.

https://twitter.com/Kuldeep061999/status/1262559621639593984?s=19

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेहम खान यांनी वकार जाका याच्यावर तो एडिट केल्याचा आरोप केला आहे. माझी प्रतिमा जनमानसात मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच माझ्या पुस्तकात इम्रान खान यांच्याविरोधात चकार शब्दही नसल्याचा दावा रेहम खान यांनी केला. मात्र सोशल मीडियावर या पब्लिसिटी स्टंट असल्याचे बोलले जात असून पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी हा खेळ सुरू असल्याचे बोलले जात आहे.

लॉकडाऊनमध्ये मिळत होती दहा हजारात रुम, दारू आणि कॉलगर्ल, पोलिसांनी उघडकीस आणले सेक्स रॅकेट

इम्रान खान समलैंगिक
याआधी रेहम खान यांनी एका मुलाखतीत इम्रान खान समलैंगिक असल्याचा आरोप केला होता. इम्रान यांचे त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षातील अनेक लोकांशी संबंध असल्याचा डावक रेहम खान यांनी केला होता. पाकिस्तानी कलाकार हमजा अली अब्बासी आणि पीटीआय सदस्य मुराद सईद हे देखील समलैंगिक असून त्यांचे इम्रान खान सोबत संबंध असल्याचा आरोप तरेहम यांनी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या