
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू व तेहरिक-ए-इंसाफ या पक्षाचा प्रमुख इम्रान खान याची माजी पत्नी रेहम खानने तिच्या आगामी पुस्तकातून एक नवा गौप्यस्फोट केला आहे. इम्रानची अनैतिक संबंधातून पाच मुलं असून त्यातील काही हिंदुस्थानात देखील असल्याचा आरोप रेहम खानने केला आहे. यातील सर्वात मोठा मुलगा हा ३४ वर्षाचा असल्याचे समोर आले आहे. रेहमने ‘टेल ऑल’ नावाचे एक पुस्तक लिहिले असून त्यात तिने हा गंभीर आरोप केला आहे.
रेहमने इम्रान खानसोबत झालेला एक संवाद तिच्या पुस्तकात प्रसिद्ध केला आहे. यात इम्रानने आपल्याला विवाहबाह्य संबंधातून पाच मुलं असल्याचे सांगितले आहे. ही सर्व मुलं पाश्चिमात्य देशातील महिलांची आहेत का असं रेहमने विचारल्यावर इम्रानने त्यातले काही हिंदुस्थानी असल्याचे सांगितले आहे.
याच पुस्तकाची काही पाने इंटरनेटवर लीक झाली होती. त्यामध्ये देखील इम्रान खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमवर देखील वासनांध असल्याचा आरोप केला होता ‘अक्रम हा त्याची वासना क्षमविण्यासाठी त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत सेक्स करायला जबरदस्ती करायचा व तेथे थांबून त्यांना सेक्स करताना बघायचा’असा गौप्यस्फोट रेहमने या पुस्तकातून केला आहे.
























































