मला ब्लॅकमेल करण्यासाठी माझ्या पत्नीचा छळ केला जातोय, इम्रान खान यांचा तुरुंगातून खळबळजनक आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांची पत्नी बुशरा बीबी यांचा तुरुंगात छळ होत असल्याचा खळखळजनक दावा केला आहे. आपल्यावर दबाव आणण्यासाठी आणि आपल्याला ‘ब्लॅकमेल’ करण्यासाठी अधिकारी आपल्या पत्नीला अमानवीय वागणूक देत असल्याचा आरोप आरोप खान यांनी केला आहे.

ईदनिमित्त इम्रान खान यांनी अदियाला जेलमधून आपल्या मुलाशी सुमारे २५ ते ३० मिनिटे फोनवर चर्चा केली. ”बुशरा बीबी यांना अत्यंत हलाखीच्या आणि एकाकी परिस्थितीत ठेवले जात असल्याचे खान यांनी म्हटले आहे. “केवळ मला ब्लॅकमेल करण्यासाठी बुशरा बीबी यांना अशी अमानवीय वागणूक कशी दिली जाऊ शकते?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. ”बुशरा बीबी यांना जवळपास पूर्णपणे एकाकी (Isolation) ठेवण्यात आले असून, त्यांना खान यांच्याशीही भेटू दिले जात नाही. केवळ राजकीय तडजोडीसाठी आणि इम्रान खान यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे”, असा दावा त्यांच्या मुलामार्फत सार्वजनिक करण्यात आलेल्या संदेशात करण्यात आला आहे.

इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेवरही कडाडून टीका केली. “या देशातील न्यायाधीशांना स्वतःची लाज वाटली पाहिजे… त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आपले आत्मे विकले आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.