
सामना प्रतिनिधी । पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडचणीत आलेले भाजप सरकार वाचवण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण केले आहे. दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आमदार सुभाष शिरोडकर आणि आमदार दयानंद सोपटे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर आज सायंकाळी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गोव्यात राजकारण तापले असून यावर काँग्रेस काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.




























































