असे असेल राम मंदिर, निर्मितीसाठी होईल एवढा खर्च

3688

आज अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमीपुजन केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत आणि राम मंदिर विश्वस्ताचे अध्यक्ष नृत्य गोपालदास हजर होते.

किती भव्य असेल मंदिर
भूमीपूजनाच्या एक दिवसापूर्वी ट्रस्टने मंदिराचा आराखडा जारी केला होता. आर्किटेक्ट निखिल सोमपुरा यांनी मंदिराचा आराखडा बनवला आहे. राम मंदिर हे नागरा शैलीत असेल. यापूर्वी 1985-86 दरम्यान विश्व हिंदू परिषदने एक आराखडा जारी केला होता. हा आराखडा निखिल सोमपुरा यांचे वडील चंद्रकंत सोमपुरा यांनी बनवला होता. सोमपुरा कुटुंबीयांनीच गुजरातच्या अक्षरधाम मंदिराचा आराखडा तयार केला होता.


मूळ आराखड्यात बदल करून मंदिराचा विस्तार वाढवण्यात आला आहे. मंदिर एकूण तीन मजली असेल. जिथे भगवान रामाचे गाभारा असेल त्यावर एक कळस असणार आहे. कळसांची आधी उंची 141 फूट होती. ती वाढवून 141 फूट करण्यात आली आहे. तर देवाच्चा गाभारा 20 बाय 20 फुटांचा सणार आहे. मंदिराची रुंदी 160 ते 235 फूट असणार आणि तर लांबी 280 ते 360 फूट असणार आहे.

मंदिरावर पाच घुमट असतील. जुन्या आराखड्यात तीन घुमठ होते. त्यात सिंहद्वार, नृत्य मंडप आणि रंग मंडपाचा समावेश होता. या भागात भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मंदिर बनण्यास लागणारा कालावधी
मंदिर पूर्ण होण्यास किमान तीन ते साडे तीन वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंदिराचा पाया 20 ते 25 फूट असणार आहे. मंदिरात 318 खांब असतील. प्रत्येक मजल्यावर 106 स्तंभ असतील आणि प्रत्येक स्तंभावर हिंदु धर्मावरील आकृत्या आणि शिल्प असतील.

किती खर्च होईल?
25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान रामजन्मभूमी ट्रस्ट राष्ट्रीय स्तरावर निधी गोळा करण्याचा कार्यक्रम हाती घेईल. असे असले तरी ट्रस्टकडे सध्या मोठ्या प्रमाणात दान येत आहे.

भूमीपुजानंतर विश्व हिंदू परिषदही मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहेत. परिषदेने 5 लाख गावात 10 कोटी कुटुंबांकडे पोहोचण्याचा लक्ष्य ठेवल आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाने किमान 100 रुपये दान करावे असे आवाहन केले आहे. ट्रस्टकडे आतापर्यंत 15 कोटी रुपये दान आल्याचे ट्रस्टने सांगितले आहे.

मंदिर बनवण्यास नेमके किती पैसे लागतील हे अजून कळालेले नाही. परंतु मंदिर बांधकामासाठी किमान 300 कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मंदिर परिसर विकासासाठी किमान 1 हजार रुपये खर्च होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामाची जुनीच मुर्ती नव्या मंदिराच्या गाभाऱ्य़ात ठेवल्या जातील. सध्या या मुर्ती मानस भवनमध्ये तात्पुरत्या स्थितीत ठेवण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या