चाकावरच्या ग्रंथालयाचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेच्या चाकावरील वाचनालयाच्या संकल्पनेचे मुंबई, पुणे आणि मुंबई-मनमाड इंटरसिटी गाडय़ांमध्ये अनुक्रमे डेक्कन आणि पंचवटी एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये सोमवारी मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा करताना त्यानिमित्ताने डेक्कन आणि पंचवटी एक्स्प्रेसच्या पासधारक डब्यांमध्ये ‘फिरते वाचनालय’ ही अभिनव संकल्पना तावडे यांनी राबविली आहे. सोमवारी त्याचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन, प्रधान वाणिज्य व्यवस्थापक शैलेंद्र कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

पीएनआर व आधार नंबरवर पुस्तक वाटप प्रवाशांच्या डब्यांमध्ये ट्रॉलीवर पुस्तकांचा शेल्फ असणार आहे. ज्याला पुस्तक वाचायचे असेल त्याला त्याचा पीएनआर आणि आधार क्रमांक द्यावा लागेल. तसेच ही ट्रॉली आणि त्यासाठीचे कर्मचारी मराठी भाषा विकास संस्थेमार्फत पुरविण्यात आले आहेत.