
सामना ऑनलाईन । बर्मिंगहॅम
इयॉन मॉर्गनच्या इंग्लंड संघाने रविवारी विराट कोहलीच्या हिंदुस्थानी संघाला पराभूत करीत स्वतःचे स्पर्धेतील आव्हान कायम राखले आणि टीम इंडियाला सेमी फायनलसाठी ‘वेटिंग’वर ठेवले. आता टीम इंडियाला उद्या बांगलादेशचा सामना करावयाचा आहे.
याप्रसंगी हिंदुस्थानचा संघ बांगलादेशला लोळवून उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी बांगलादेशला उर्वरित दोन लढतींमध्ये विजय आवश्यक आहे. एक पराभव त्यांचा स्पर्धेतील पत्ता कट करू शकतो. तसेच इंग्लंडचा न्यूझीलंडवरील विजयही त्यांचा घात करू शकतो. सध्या तरी त्यांना उद्याच्या लढतीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. बघूया, बांगलादेश हिंदुस्थानला धक्का देतोय का ते.


























































