#INDvBAN – टीम इंडियाचा 8 विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी

1591

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात दुसरा टी-20 सामना राजकोट येथे झाला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने 20 षटकांमध्ये 6 बाद 153 धावा करत टीम इंडियापुढे विजयासाठी 154 धावांचे आव्हान ठेवले.बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा टीम इंडियाने यशस्वी पाठलाग केला आणि 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला व मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानकडून रोहित शर्मा आणि शिखर धवनने शतकी सलामी दिली. रोहितने शंभराव्या सामन्यात अर्धशतकीय खेळी पूर्ण केली. या दरम्यान आक्रमक खेळणारा धवन 31 धावांवर बाद झाला. धवन बाद झाल्यानंतर रोहितही 85 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि राहुलने टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी बांगलादेशकडून मोहम्मद नईमने 36, मोहमदुल्लाहने 30 आणि सौम्य सरकारने 30 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून सर्वाधिक 2 बळी युझवेंद्र चहलने घेतले. चहर, खलिल, आणि सुंदरने प्रत्येकी एक बळी घेतला.

लाईव्ह अपडेट – 

 • नागपूरमध्ये होणार मालिकेतील अंतिम आणि निर्णयाक सामना
 • मालिकेत 1-1 बरोबरी
 • टीम इंडियाचा 8 विकेट्सने दणदणीत विजय
 • विजयासाठी 4 धावांची आवश्यकता
 • टीम इंडियाच्या 150 धावा पूर्ण
 • रोहित शर्मा 43 चेंडूत 85 धावा काढून बाद
 • टीम इंडियाला दुसरा धक्का

 • 12 षटकानंतर टीम इंडियाच्या 1 बाद 125 धावा
 • टीम इंडियाला पहिला धक्का, धवन 31 धावांवर बाद
 • रोहितचे लागोपाठ 3 षटकार
 • टीम इंडियाच्या 100 धावा
 • 24 चेंडूत अर्धशतकीय खेळी साकारली
 • शंभराव्या सामन्यात रोहितची अर्धशतकीय खेळी

 • सहा षटकानंतर टीम इंडियाच्या बिनाबाद 63 धावा
 • दोन षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 19 धावा
 • पहिल्या षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 11 धावा
 • टीम इंडियाची फलंदाजी सुरू

रोहितचं अनोखं ‘शतक’, गावस्कर, कपिलदेव यांच्या पंक्तीत स्थान

 • 20 षटकांमध्ये बांलगादेशच्या 6 बाद 153 धावा

 • बांगलादेशच्या 150 धावा पूर्ण
 • मोहमदुल्लाह 30 धावांवर बाद, चहरने घेतला बळी
 • बांगलादेशचा सहावा खेळाडू बाद
 • 18 षटकानंतर बांगलादेशच्या 5 बाद 140 धावा
 • खलिलने आफिफ हुसैनला केले 6 धावांवर बाद
 • बांगलादेशचा निम्मा संघ माघारी

 • 14 षटकानंतर बांगलादेशच्या 4 बाद 106 धावा
 • चहलने घेतला दुसरा बळी
 • सौम्य सरकार 30 धावांवर बाद
 • बांगलादेशला चौथा धक्का
 • बांगलादेशच्या 100 धावा पूर्ण
 • रहिम 4 धावांवर बाद
 • बांगलादेशला तिसरा धक्का

 • बारा षटकानंतर बांगलादेशच्या 2 बाद 93 धावा
 • सुंदरच्या गोलंदाजीवर नईम 36 धावांवर बाद
 • बांगलादेशच्या दुसरा धक्का
 • दहा षटकानंतर बांगलादेशच्या 1 बाद 78 धावा
 • नऊ षटकानंतर बांगलादेशच्या 1 बाद 70 धावा
 • चहलच्या गोलंदाजीवर पंतने केले धावबाद
 • लिट्टन दास 29 धावांवर बाद
 • बांगलादेशच्या पहिला धक्का

 • पॉवरप्लेमध्ये बांगलादेशच्या बिनबाद 54 धावा
 • बांगलादेशच्या 50 धावा पूर्ण
 • पाच षटकानंतर बिनबाद 41 धावा
 • बांगलादेशची दमदार सुरुवात
 • दोन षटकानंतर बिनबाद 20 धावा
 • पहिल्या षटकानंतर बिनबाद 6 धावा
 • बांगलादेशच्या फलंदाजीला सुरुवात

दुसऱ्या टी-20 साठी हिंदुस्थानचा संघ –

नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

आपली प्रतिक्रिया द्या