IND vs ENG 3rd Test – टीम इंडियाची घोडदौड 387 धावांवर थांबली, तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त; इंग्लंडने घेतली आघाडी

Photo - BCCI

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या कसोटी सामन्यातील तिसरा दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. दिवसा अखेर टीम इंडियाचा पहिला डाव 387 धावांवर आटोपला. टीम इंडियाला आघाडी घेण्यात अपयश आलं आहे. कारण इंग्लंडने सुद्धा आपल्या पहिल्या डावात 387 धावा केल्या होत्या. इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून त्यांनी बिनबाद 2 धावा केल्या आहेत.

केएल राहुल (100), ऋषभ पंत (74) आणि रविंद्र जडेजा (72) यांनी पहिल्या डावात टीम इंडियाचा डाव सावरला. त्यामुळे टीम इंडियाला 387 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. आता दुसऱ्या डावात इंग्लंडला कमीत कमी धावांवर रोखण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिका सध्या बरोबरीत आहे. परंतु लॉर्ड्च्या ऐतिहासिक मैदानावर विजय मिळवत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ कडवी झुंज देत आहेत.

IND Vs ENG 3rd Test – ऋषभ पंतच्या विस्फोटक अंदाजामुळे Viv Richards यांचा विक्रम मोडित