IND VS ENG TEST : पुजाराचे नाबाद शतक, हिंदुस्थानकडे नाममात्र आघाडी

सामना ऑनलाईन । साऊथहॅप्टन

साऊथहॅप्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानचा पहिला डाव 273 धावांत संपुष्टात आला. हिंदुस्थानने पहिल्या डावात इंग्लंडवर महत्त्वपूर्ण अशी 27 धावांची आघाडी घेतली आहे. हिंदुस्थानकडून चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत नाबाद 132 धावा ठोकल्या. तर कर्णधार विराट कोहलीने 46 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक पाच बळी घेतले. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद 6 धावा केल्या असून इंग्लंडचा संघ अद्यापही 21 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडने पहिल्या डावात सर्व बाद 246 धावा केल्या होत्या.