कुमार धर्मसेना ‘पंच’धर्म विसरले? इंग्लंडच्या संघाला खाणाखुणा करताना कॅमेऱ्यात कैद, ओव्हलवर नेमकं काय घडलं?

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात सुरू असलेली अँडरसन-तेंडुलकर मालिका सध्या वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिल्या सामन्यापासून दोन्ही संघात वादाची ठिणगी पडल्याचे आपण पाहिले. ओव्हल कसोटीच्या पूर्वसंध्येला गौतम गंभीर आणि पीच क्यूरेटरमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. आता कसोटीच्या पहिल्याच दिवशी श्रीलंकेचे अनुभवी पंच कुमार धर्मसेना यांनी केलेल्या खाणाखुणआ कॅमेऱ्यात कैद झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. धर्मसेना यांनी इंग्लंडच्या संघाला डीआरएस घेण्यापासून रोखल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

हिंदुस्थानचा सलामीवीर साई सुदर्शन स्ट्राईकवर होता आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टंग गोलंदाजी करत होता. ढगाळ वातावरण असल्याने चेंडू कमालीचा स्विंग होत होता. टंगचा एक चेंडू स्विंग होऊन साई सुदर्शनच्या पॅडवर जोराने आदळला. इंग्लंडच्या खेळाडूंनी आऊटसाठी जोरदार अपील केले. मात्र कुमार धर्मसेना यांनी साईला नॉट आऊट दिले.

इंग्लंडचा गोलंदाज टंग आणि कर्णधार ओली पोप रिव्ह्यू घेतात की काय असे वाटत असतानाच पंच कुमार धर्मसेना यांनी हाताने खाणाखूणा केल्या आणि चेंडू बॅटला लागल्याचा इशारा केला. यामुळे इंग्लंडचा रिव्ह्यू वाचला. आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून धर्मसेना यांनी आपला पंचधर्म सोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

ओव्हलवर घडलेल्या घटनेनंतर सोशल मीडियावर कुमार धर्मसेना हे क्रीडा चाहत्यांच्या निशाण्यावर आले. मैदानात अशा प्रकारे खाणाखुणा करून इंग्लंडला मदत करण्यासारखेच आहे. अपील फेटाळल्यानंतर 15 सेकंद डीआरएस घेण्यासाठी मिळतात, मात्र तत्पूर्वीच धर्मसेना यांनी चेंडू बॅटला लागून गेल्याचा इशारा केला.

ओव्हलवर फलंदाजांचे हाल; फलंदाजांपेक्षा पावसाचीच जोरदार बॅटिंग, हिंदुस्थान 6 बाद 204

विशेष म्हणजे पंचांवर आरोप होण्याची ही या मालिकेतील पहिली वेळ नाही. याआधी क्रिस गॅफनी यांच्यावरही इंग्लंडला सहकार्य केल्याचा आरोप झाला होता. इंग्लंडने अपील केल्यानंतर सहज आऊट देणारे हिंदुस्थानी खेळाडूंनी अपील केल्यावर ढम्म उभे रहायचे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात रान उठले होते.

क्रिकेटवारी – पुन्हा येरे माझ्या मागल्या!