‘शोले’तील कॉईन हवा होता, पाचव्यांदा टॉस हरल्याने विराट नाराज

सामना ऑनलाईन । ओव्हल

टीम इंडिया आणि इंग्लंड संघात शुक्रवारपासून पाचवी कसोटी सुरू झाली. या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्ध सलग पाचव्या कसोटीत विराट नाणेफेक हरला.

IND VS ENG : हैदराबादचा ‘लक्ष्मण’ हनुमा विहारीचे कसोटीत पदार्पण

सलग पाचव्या कसोटीत नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला नाही त्यामुळे विराट काहीसा नाराज झाला. नाणेफेक झाल्यानंतर बोलताना विराटने आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी विराट म्हणाला की, आता मला असं वाटतंय की दोन्ही बाजूने छापा म्हणजे हेड्स असलेल्या कॉईनची मला आवश्यकता आहे. तरच मी नाणेफेक जिंकू शकेन.’

शोलेत बच्चनचा कॉईन अजरामर
सुपरहिट शोले चित्रपटामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन याच्याकडे दोन्ही बाजूने एकच छाप असणारा कॉईन होता. या चित्रपटातील धर्मेंद्र आणि अमिताभचे या कॉईनसंदर्भात चित्रित करण्यात आलेले दृश्य प्रचंड गाजले होते. तसेच नाणे आपल्याकडे हवे होते असे विराटने शोले चित्रपटाचा उल्लेख न करता बोलून दाखवले.

आपली प्रतिक्रिया द्या