IND VS ENG TEST- बुमराहचा ‘पंच’, हिंदुस्थानचा 203 धावांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नॉटिंगहम

नॉटिंगहम कसोटीत हिंदुस्थानने इंग्लंडचा 203 धावांनी पराभव केला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हिंदुस्थानचा हा पहिला विजय आहे. अद्याप दोन सामने बाकी असून इंग्लंडकडे 2-1 अशी आघाडी आहे. चौथा सामना साऊथहॅप्टन येथे 30 ऑगस्टपासून रंगणार आहे.

हिंदुस्थानने इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचे आव्हान ठेवले होते. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने 9 बाद 311 धावा केल्या होत्या. रशिद 30 आणि अँडरसन 8 धावांवर नाबाद होते. चौथ्या दिवशी बुमराहने पाच बळी घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले. तसेच इशांत शर्माने 2 आणि शमी व पांड्याने प्रत्येकी 1 बळी घेतला. परंतु स्टोक्स आणि बटलरने 169 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा पराभव लांबवला. बटरलने कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले.

लाईव्ह अपडेट –

  • टीम इंडियाने नॉटिंगहम कसोटी 203 धावांनी जिंकली
  • पाचव्या दिवशी हिंदुस्थानला विजयासाठी एका विकेटची आवश्यकता
  • रशिद आणि अँडरसन ही शेवटची जोडी मैदानात
  • पाचव्या दिवसाचा खेळ सुरू

  • ट्रेंट ब्रीजमध्ये 23 वे शतक ठोकून विराटचा खास विक्रम