
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज पासून सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक 226 धावांचा यशस्वी पाठलग करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात संजू सॅसमन, श्रेयस अय्यर आणि नमन धीर यांनी दणकेबाज फलंदाजी करत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. तर अभिषेक शर्माने टीम इंडियाला ताबडतोब सुरुवात करून देत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
अभिषेक शर्माने आपल्या नेहमीच्या शैलीत सामन्याची दणक्यात सुरुवात केली. त्याने 12 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 29 धावांची खेळी केली. संजू सॅमसनच्या मदतीने त्याने पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे त्याने आपल्याच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. हा षटकार ऐतिहासिक ठरला, कारण टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूंवर षटकार ठोकण्याची कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि आपला पहिलाच चेंड थेट सीमारेषेबाहेर धाडला.
टी20 क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये अभिषेक शर्मा सर्वाधिक 7 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा शफीफुल्ला शनिवारी (6), तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव (5) आणि चौथ्या क्रमांवर 4 षटकारांसह संयुक्तरित्या पॉर्ल स्टर्लिंग (आयर्लंड), कॉलिन मुनरो (न्यूझीलंड) आणि मोहम्मद नवीन (UAE) या खेळाडूंचा समावेश आहे.



























































