#INDvsNZ हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

हिंदुस्थानचा संघ दीर्घ अशा न्यूझीलंड दौऱ्यावर दाखल झाला आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचा संघ टी-20 मालिका, एक दिवसीय मालिका आणि कसोटी मालिका खेळणार आहे. सहा आठवड्यांचा हा दौरा आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.

दिल्लीवर मुंबई भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’

नवीन वर्षात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक दिवसीय मालिका जिंकल्याने विराटसेनेचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार. मात्र सलामीवीर शिखर धवन आणि इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाला धक्का बसला. धवनच्या जागी टी-20 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ याची वर्णी लागली आहे.

टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्‍मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन.

एक दिवसीय मालिकेसाठीचा हिंदुस्थानचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकुर.

न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक –

टी-20 मालिका –

पहिला सामना – 24 जानेवारी, ऑकलँड
दुसरा सामना – 26 जानेवारी, ऑकलँड
तिसरा सामना – 29 जानेवारी, हेमिल्टन
चौथा सामना – 31 जानेवारी, वेलिंग्टन
पाचवा सामना – 2 फेब्रुवारी, माऊंट मॉन्गनुई
(सर्व लढती हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरू होईल)

एक दिवसीय मालिका –

पहिला सामना – 5 फेब्रुवारी, हॅमिल्टन
दुसरा सामना – 8 फेब्रुवारी, ऑकलंड
तिसरा सामना – 11 फेब्रुवारी, माऊंट मॉन्गनुई
(सर्व लढती हिंदुस्थानी वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता सुरू होईल)

न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 3 दिवसाचा सराव सामना 14 ते 16 फेब्रुवारी, हॅमिल्टन
(हिंदुस्थानी वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता सामना सुरु होईल)

कसोटी मालिका –

पहिला सामना – 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी, वेलिंग्टन
दुसरा सामना – 29 फेब्रुवारी ते 4 मार्च, ख्राईस्टचर्च
(दोन्ही लढती भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजता सुरू होईल)

आपली प्रतिक्रिया द्या