
कोलकाताच्या ऐतिहासिर इडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण संघ 159 धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेने लोटांगण घातलं आणि अवघ्या 55 षटकांमध्येच संपूर्ण संघ तंबूत परतला. दिवसा अखेर टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली असून 20 षटकांमध्ये 1 विकेट गमावत 37 धावा केल्या आहेत.
नाणेफेक जिंकल्यानंतर टेम्बा बवुमाने प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला होता. मात्र, टेम्बाचा हा निर्णय टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उधळून लावला. टेस्ट चॅम्पियन्सची जसप्रीत बुमराहने भंबेरी उडवून दिली. जसप्रीतने अचूक मारा करत पाच विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येक 2 विकेट घेतल्या. तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 159 धावांवर संपुष्टात आला. अॅडम मारक्रम (31) व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 30+ धावसंख्या करता आली नाही. प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली आहे. सध्या केएल राहुल (13*) आणि वॉशिंग्टन सुंदर (06*) नाबाद फलंदाजी करत आहेत. तर यशस्वी जयस्वाल 12 या धावसंख्येवर अगदी स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाने दिवसाअखेर 37 धावा केल्या आहेत.
🎥 A glimpse of Jasprit Bumrah’s Eden Gardens masterclass! \|/ 🙌
Updates ▶️ https://t.co/okTBo3qxVH#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/dmkaVZXRIk
— BCCI (@BCCI) November 14, 2025


























































