LIVE- देशात कोरोनावरील 3 लसींचे संशोधन सुरू- पंतप्रधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • शेजारी राष्ट्रांशी आर्थिक सामाजिक सांस्कृतिक नाती बळकट करण्यासाठी हिंदुस्थान सातत्याने प्रयत्नशील आहे
  • लडाखमध्ये आम्ही काय करू शकतो हे जगाने पाहिले
  • देशाच्या सामर्थ्याला आव्हान देणाऱ्यांना जवानांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे
  • देशाच्या सीमेवर सामर्थ्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला
  • प्रोजेक्ट डॉल्फीन सुरू करणार, नदी आणि समुद्रातील डॉल्फीनचा यात समावेश असेल
  • देशात 200 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होत आहे
  • लस कमीत कमी वेळेत सगळ्या देशवासीयांपर्यंत कशी पोहोचेल याची योजना तयार आहे
  • लसींना हिरवा झेंडा मिळताच मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्पादन होईल
  • हिंदुस्थानात 3 लसींचे संशोधन विविध चाचण्यांच्या पातळीवर आहेत
  • देशातील संशोधक कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत
  • आजपासून राष्ट्रीय डिजीटल आरोग्य योजना (National Digital Health Mission ) सुरू करणार, प्रत्येक नागरिकाला आरोग्य ओळखपत्र दिले जाणार
  • सगळ्या गावांपर्यंत ऑप्टीकल फायबर द्वारे इंटरनेट पोहचवण्याचे काम केले जाणार, 1000 दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार
  • दीड लाख ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टीकल फायबरचे जाळे पोहोचले आहे
  • 110 मागास जिल्ह्यांना इतर जिल्ह्यांच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणार
  • पायाभूत सुविधा एकमेकांना पूरक करण्याचे काम करणे गरजेचे
  • राष्ट्रीय पाईपलाईन योजनेवर काम सुरू होणार
  • कोरोनातून देशाला बाहेर काढणे ही प्राथमिकता असेल
  • कोरोना, वादळे, टोळधाड यासारखी एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरु राहिली, मात्र देश पुढे जात राहिला
  • स्थानिक गोष्टींचे गुणगान गायले पाहिजे, व्होकल फॉर लोकल झाले पाहिजे
  • देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक अडचणी आहेत, मात्र कोट्यवधी देशवासी यावरही समाधान शोधून काढतील
  • कच्चा माल निर्यात करायचा आणि तयार वस्तू आयात करायचे हे कधीपर्यंत चालणार ?
  • देश समर्थ झाला तर जगाच्या कल्याणासाठी आपण सरसावू शकतो
  • हिंदुस्थानने एकदा ठरवले तर तो ती गोष्ट करतोच, याला इतिहास साक्षीदार आहे
  • देश स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे, आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे
  • देशवासीयांनी आत्मनिर्भर हिंदुस्थान करण्याचा संकल्प सोडला आहे
  • पंतप्रधानांनी झेंडा फडकवला तेव्हा मेजर श्वेता पांडे यांनी सहाय्य केले
  • स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील तेव्हा
  • संकटाच्या समयी राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून जितकी मदत पोहचवता येईल ती पोहचवू
  • काही ठिकाणी पूर, भुस्स्खलन, दरड कोसळल्याच्या काही राज्यांमध्ये दुर्घटना झाल्या
  • कोरोनावर आपण विजय मिळवणारच
  • कोरोनायोद्धांना मी नमन करतो
  • लाखो कोरोनायोद्ध्यांनी सेवा परमो धर्मो: या भावनेने काम केले
  • एका विशिष्ट परिस्थितीतून आपण जात आहोत, कोरोना काळातून आपण जात आहोत
  • पंतप्रधानांच्या भाषणाला सुरुवात
  • लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला
  • स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण